पुरुष वंध्यत्व (Male Infertility) म्हणजे अनेक वर्षे प्रयत्न करूनही मुलबाळ न होणे. भारतामध्ये वंध्यत्वाचा म्हणले की माहिलांना दोष दिला जातो. मुलं जन्माला घालण्यासाठी महिलाच जबाबदार असतात पण गर्भधारणा होण्यास अडचण येत असल्यास पुरुषही जबाबदार असतात.भारतातील पुरुष वंध्यत्वाचे प्रमाण सुमारे 23 टक्के आहे. आणि दुर्दवाने गेल्या काही वर्षांपासून भारतात यात सातत्याने वाढ होत आहे.
पुरुष वंध्यत्व म्हणजे काय?
गर्भधारणा न होण्यास वंधत्व असे म्हणतात. पुरुष वंध्यत्व हा प्रजनन प्रणालीचा एक आजार आहे जो नियमित असुरक्षित लैंगिक संभोगानंतर 1 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ गर्भधारणा साध्य करण्यात अपयशी ठरतो.गर्भधारणा करण्यास योग्य शुक्राणूंचे पुरेशा प्रमाणात उत्पादन करू न शकल्याने गर्भधारणा करण्यास अडचणी येऊ शकतात. तसेच इतरही कारणे आहेत.
पुरुषांमध्ये वंध्यत्वाचे कारण –
शारीरीक तसेच मानसिक स्तरावरील कारणे याला जबाबदार असू शकतात.
- वीर्य कमी होणे
- शुक्राणूंचे कमी उत्पादन
- शुक्राणूंचे असामान्य कार्य ते शुक्राणूंच्या वितरणास प्रतिबंध करण्यात अडथळा किंवा वितरण मार्गामध्ये अडथळे
- जननेंद्रियाला (genitalia) दुखापत झाल्यास
- धूम्रपान, अति मद्यपान,
- सकस आहार व व्यायामाचा अभाव
- ताण तणाव, डिप्रेशन
- अतिलठ्ठपणा
- रसायने आणि कीटकनाशकांचा दररोज संपर्क
- आजारपण, दुखापत, दीर्घकालीन आरोग्य समस्या, चुकीच्या जीवनशैलीची निवड
पुरुषांमध्ये वंध्यत्वाचे निदान –
वंध्यत्वाचे निदान करताना संपूर्ण वैद्यकीय इतिहास, शरीर चाचणी, रक्त चाचणी, सामान्य संप्रेरक चाचणी आणि वीर्य विश्लेषण केले जाते. काही मानसिक कारणे असल्यास त्यावरही उपचार सुरू करता येतात. जितक्या लवकर एखाद्या तज्ज्ञांकडे जाताल आणि निदान कराल तितक्या लवकर ही समस्या लक्षात येते तितक्या लवकर समस्येचे निराकरण होऊ शकते.
पुरुष वंध्यत्व चे उपचार –
औषधोपचार किंवा समुपदेशनाच्या रूपात लैंगिक समस्यांवर उपचार केल्यास इरेक्टाइल डिसफंक्शनकिंवा अकाली वीर्यपतन यांसारख्या परिस्थितीत प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत होते. तसेच जीवनशैलीमध्ये बदल करण्याचा सल्ला दिला जातो.धूम्रपान आणि मद्यपान बंद करणे, मधुमेह, लठ्ठपणा इत्यादींवर नियंत्रण मिळवणे महत्वाचे ठरते.पुरुष वंध्यत्वाच्या उपचारासाठी लोकप्रिय तंत्रांमध्ये इंट्रायूटरिन फर्टिलायझेशन (IUI), इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) आणि इंट्रासाइटोप्लाज्मिक स्पर्म इंजेक्शन (ICSI) यांचा समावेश आहे. प्रगत तंत्रज्ञान जसे की मायक्रो-टीईएसई, आयएमएसआय आणि स्पर्म व्हीडी क्रायोप्रिझर्वेशन उपकरणे देखील पुरुष वंध्यत्वावर उपचार करण्यासाठी मदत करतात.
योग्य वेळी तज्ञ डॉक्टर यावर मार्गदर्शन करून उपचार करू शकतात . युरोलाइफ क्लीनिक मध्ये यावर तज्ञ डॉक्टर आणि त्यांची टीम सहकार्य करून यावर उपचार करतात.
डॉ. इरफान शेख , यूरोलॉजिस्ट (Urologist) आणि यूरो सर्जन (Uro Surgeon) (एमबीबीएस, एमएस (जनरल सर्जरी), एमसीएच यूरोलॉजी), हे पुण्यातील टॉप युरोलॉजिस्टपैकी (Top Urologist in Pune) एक आहेत. डॉ. इरफान शेख हे युरोलॉजी विभागातील सुवर्णपदक विजेते आहेत. त्यांनी पुण्यातील बायरामजी जीजीभॉय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून जनरल हॉस्पिटलमधून एमबीबीएस केले आहे. तसेच पीजीआय, चंदीगड येथून जनरल सर्जरीमध्ये एमएस केले आहे. डॉ. इरफान शेख आपल्या रूग्णांवर वर्षानुवर्षे यशस्वीपणे उपचार करत आहेत. Urolife तुम्हाला सर्व प्रकारच्या युरोलॉजिकल उपचार सेवा प्रदान करते, जसे की किडनी स्टोनचे उपचार, मूत्राशयातील खडे उपचार, प्रोस्टेट कर्करोग उपचार, किडनी कर्करोग उपचार, आणि मूत्रमार्गाच्या संसर्गावरील उपचार, RIRS शस्त्रक्रिया आणि किडनी स्टोन काढण्यासाठी PCNL शस्त्रक्रिया आणि एन्ड्रोलॉजिकल ट्रीटमेंट सेवा. तसेच सेक्सोलॉजी थेरपी यावरही उपचार होतात.