यौन इच्छा असणे किंवा नसणे हे शारीरिक तसेच मानसिक आरोग्याशी संबंधित आहे. काही व्यक्तींना काही वेळा यौन इच्छा कमी होऊ शकते आणि ही एक सामान्य समस्या असू शकते. यौन इच्छा कमी होण्यामागे विविध कारणे असू शकतात. आजच्या ब्लॉगमध्ये आपण यौन इच्छा कमी होणे : कारणे आणि उपाययोजना याबद्दल माहिती बघणार आहोत…
यौन इच्छा कमी होण्याची कारणे
यौन इच्छा कमी होण्यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात, त्यापैकी काही कारणे पुढील प्रमाणे आहेत :
१. हार्मोनल बदल – Hormonal Changes
स्त्री किंवा पुरुषांमध्ये हार्मोनल बदल झाल्यामुळे यौन इच्छेवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
उदाहरणार्थ, गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर केल्याने, गर्भधारणेसाठी उपचार सुरू असल्यास, तसेच वयाच्या वाढीशी संबंधित हार्मोनल बदल जसे की मेनोपोज.
२. आरोग्य समस्या – Health Problems
शारीरिक आरोग्यशी संबंधित काही समस्या असल्यास जसे की डायबेटीस, हायपर टेन्शन यामुळे यौन इच्छेवर परिणाम होऊ शकतो.
३. औषधांचा वापर – Use of drugs
काही व्यक्तींना काही शारीरिक किंवा मानसिक समस्या असतील जसे की डिप्रेशन, रक्तदाब आणि यावर उपचार सुरू असतील तर त्या औषधांच्या वापराने सुद्धा यौन इच्छेवर परिणाम होऊ शकतो.
४. शारीरिक आणि मानसिक थकवा – Physical and mental fatigue
रोजच्या जीवनशैलीमध्ये मानसिक किंवा शारीरिक कष्ट अधिक होत असल्यास शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवू शकतो यामुळे सुद्धा यौन इच्छेवर परिणाम होऊ शकतो.
५. तणाव आणि चिंता – stress and anxiety
काही व्यक्तींमध्ये दैनंदिन जीवनातील समस्या, मानसिक तणाव यामुळे सुद्धा यौन इच्छेवर परिणाम होऊ शकतो.
६. Depression – नैराश्य
मानसिक असंतुलन किंवा डिप्रेशन या कारणामुळे यौन इच्छा कमी होऊ शकते. तसेच नकारात्मक विचार करणे, आत्मविश्वास कमी असणे मानसिक चिडचिड होणे हे सुद्धा याची काही कारणे आहेत.
७. संवेदनशीलता :
काही व्यक्तींना शारीरिक किंवा मानसिक दुःख असते तसेच लिंग संबंधित काही समस्या असतात, दडपण येणे या काही कारणांमुळे सुद्धा यौन इच्छेवर परिणाम होऊ शकतो.
८. वैयक्तिक संबंधांमध्ये समस्या
लग्नामधील किंवा जोडीदारासोबत काही तणाव असल्यास किंवा तणावपूर्ण संबंध असल्यास यामुळे यौन इच्छा कमी होऊ शकते.
९. संवादाची कमतरता – Lack of communication
हल्लीच्या धावपळीच्या जगामध्ये नवरा बायको मध्ये संवाद विविध कारणांमुळे कमी झाला आहे,जो काही वेळ घरी मिळतो त्यामध्ये बराच वेळ काही लोक मोबाईलवर घालवतात . संवादाची कमतरता असल्याने सुद्धा नवरा बायकोच्या नात्यांमध्ये तणाव येऊ शकतो.
१०. आहार आणि जीवनशैली – Diet & Lifestyle Changes
व्यवस्थित आहार न घेणे, व्यायामाचा अभाव असणे तसेच धूम्रपान किंवा मध्यपान करणे, अति तणाव असणे ही काही कारणे सुद्धा यौन इच्छेवर परिणाम करतात.
यौन इच्छा कमी होणे : उपाय योजना
१. मेडिटेशन आणि योग
मानसिक तसेच शारीरिक तणाव कमी करण्यासाठी, चिंता कमी करण्यासाठी योग, मेडिटेशन करणे अत्यंत आवश्यक आहे. असे केल्यामुळे मानसिक शांतता मिळते. यामुळे यौन इच्छेवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
२. नियमित व्यायाम
नियमित व्यायाम केल्यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते त्यामुळे हार्मोनल संतुलन राखता येते आणि शारीरिक तसेच मानसिक थकवा सुद्धा कमी होतो.यामुळे यौन इच्छेवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
३. संतुलित आहार घेणे
आपल्या आहारामध्ये फळे, पालेभाज्या तसेच आवश्यक आहाराचा समावेश करावा, यामुळे शारीरिक आरोग्य व्यवस्थित राहते आणि यौन इच्छेवर सकारात्मक प्रभाव पडू शकतो.
४. जोडीदारासोबत संवाद वाढवणे
संवादाची कमतरता असणे हे सुद्धा यौन इच्छेवर नकारात्मक परिणाम करते म्हणूनच आपल्या जोडीदारासोबत संवाद ठेवणे ,अधिक वेळ घालवणे एकमेकांमधील विश्वास दृढ करणे हे सुद्धा आवश्यक आहे असे केल्यामुळे यौन इच्छेमधील अडचणी दूर होऊ शकतात.
५. धूम्रपान आणि मद्यपान करणे टाळा
धूम्रपान आणि मद्यपान केल्यामुळे शारीरिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो याचा परिणाम यौन इच्छेवर सुद्धा होतो. त्यामुळे व्यसन करणे टाळावे.
६. पुरेशी झोप येणे
आपल्या शरीरासाठी सात ते आठ तासांची झोप आवश्यक असते त्यामुळे दररोज पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे. पुरेशी झोप घेतल्यास मानसिक आणि शारीरिक ऊर्जा टिकून राहते.
७. समुपदेशन
मानसिक ताणतणाव, चिंता तसेच डिप्रेशन असेल तर यावर समुपदेशन घेतल्यामुळे यौन इच्छा कमी होण्यावर नियंत्रण मिळवता येते. हे समुपदेशन जोडप्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.
८. डॉक्टरांचा सल्ला
शारीरिक समस्या असल्यास तसेच हार्मोनल असंतुलन असल्यास यामुळे जर यौन इच्छा कमी होत असेल तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतात आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषधोपचार केले जाईल.
अशा रीतीने यौन इच्छा कमी होणे ही एक सामान्य समस्या आहे. यावर उपाय म्हणून शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे तसेच वैयक्तिक संबंध सुधारणे, आवश्यक असल्यास डॉक्टरांकडून समुपदेशन तसेच सल्ला घेणे आणि आपल्या जीवनशैलीमध्ये चांगले आणि सकारात्मक बदल करणे अशा काही गोष्टी केल्यामुळे नक्कीच महत्त्वपूर्ण प्रभाव आपल्या जीवनावर पडू शकतो.
याव्यतिरिक्त जर या संदर्भामध्ये अधिक मार्गदर्शनाची गरज असेल तर तुम्ही Urolife Clinic येथे Dr. Irfan Shaikh – Sexologist in Pune यांच्याशी संपर्क साधू शकता.