मूत्रमार्गामध्ये जळजळ होणे तसेच वेदना होणे ही समस्या काही लोकांमध्ये जाणवू शकते. या समस्येचे वेगवेगळी कारणे असू शकतात यावर वेळेमध्ये आणि योग्य ते उपचार होणे अत्यंत आवश्यक आहे. मूत्रमार्गामध्ये जळजळ आणि वेदना होण्याची कारणे तसेच त्यावर काय उपचार घेतले पाहिजेत हे आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणून घेणार आहोत.

मूत्रमार्गातील जळजळ आणि वेदना होण्याची कारणे :

मूत्रमार्गामध्ये जळजळ आणि वेदना होण्याची व्यक्तींमध्ये वेगवेगळी कारणे असू शकतात परंतु त्यापैकी काही कारणे पुढील प्रमाणे आहेत :

यु्रिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI) 

– मूत्रमार्गामध्ये युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI)  झाल्यामुळे मूत्रमार्गामध्ये जळजळ आणि वेदना जाणवू शकतात.

– मूत्रमार्गामध्ये बॅक्टेरियाने प्रवेश केल्यामुळे सुद्धा ही समस्या जाणवू शकते.

– मूत्रमार्गामध्ये संसर्ग होणे ही समस्या गर्भवती महिला तसेच रजोनिवृत्तीपर्यंत पोहोचलेल्या महिलांमध्ये अधिक प्रमाणामध्ये जाणू शकते.

– मूत्रमार्ग, मूत्रपिंड तसेच मूत्राशय या कुठल्याही अवयवांमध्ये जळजळ झाली तरी वेदना जाणवू शकतात.

आहारामध्ये चुकीचे पदार्थ घेतल्यास

काही आहारातील जळजळ होणारे पदार्थ, जसे की मिरच्यांचा अति वापर, कॉफी, अल्कोहोल, आणि शुगर या प्रकारच्या पदार्थांचा अतिरिक्त वापर केल्यामुळे सुद्धा मूत्रमार्गात जळजळ होऊ शकते.

डिहायड्रेशन

काही लोक शरीरास जितके पाणी आवश्यक आहे त्यापेक्षा कमी पाणी सेवन करतात त्यामुळे डीहायड्रेशन जाणवू शकते आणि मूत्र अधिक संकुचित होऊन जळजळ आणि वेदना सुद्धा जाणवू शकतात.

गर्भधारणेच्या परिणामस्वरूप काही बदल झाल्यास

महिलांना गर्भधारणे दरम्यान हार्मोन्स मध्ये बदल होत असतात अशावेळी सुद्धा मूत्रमार्गामध्ये जळजळ किंवा वेदना जाणवण्याची शक्यता असू शकते.

इतर आरोग्य समस्या

एस टी आय ( लैंगिक संक्रमित संक्रमण ), एपीडीडीमायटीस, प्रोस्टाटायटिस , पी आय डी ( ओटीपोटीचा दाह ), सिस्टीटीस, किडनी स्टोन यांसारख्या समस्यांमुळेही मूत्रमार्गात जळजळ आणि वेदना निर्माण होऊ शकतात.

एस टी आय ( लैंगिक संक्रमित संक्रमण )

ज्या व्यक्तींना एस टी आय म्हणजेच लैंगिक संक्रमित संसर्ग असतो अशा व्यक्तींना लघवी करतेवेळी जळजळ होणे तसेच वेदना होणे अशी लक्षणे जाणवू शकतात.एस टी आय मध्ये गोनोरिया, क्लॅमिडीया यांचा समावेश आहे.

एपीडीडीमायटी

एपीडीडायमीस हे अंडकोषाच्या मागे स्थित असून शुक्राणू साठवून वाहून नेते या ठिकाणी जळजळ जाणवल्यास सुद्धा मूत्रमार्गामध्ये वेदना किंवा जळजळ होऊ शकते.

प्रोस्टाटायटिस

यामध्ये प्रोस्टेट ग्रंथीला सूज येऊ शकते आणि त्यामुळे मूत्रमार्गामध्ये वेदना किंवा जळजळ जाणवू शकते.

पी आय डी ( ओटीपोटीचा दाह )

अंडाशय, फॅलोपियन ट्यूब तसेच गर्भाशयाला पी आय डी प्रभावित करू शकते. ओटी पोटामध्ये दुखल्यामुळे तसेच पी आय डी हा जिवाणू संसर्ग झाल्यामुळे होऊ शकतो अशा परिस्थितीमध्ये सुद्धा मूत्रमार्गामध्ये वेदना किंवा जळजळ या समस्या जाणवू शकतात.

सिस्टीटीस

मुद्राशयाच्या आवरणाची जळजळ म्हणजेच सिस्टीटीस.सिस्टीटीस या कारणामुळे सुद्धा मूत्रमार्गामध्ये जळजळ होऊ शकते किंवा वेदनादायक लघवी होऊ शकते.

किडनी स्टोन

ज्या व्यक्तींना किडनी स्टोन आहे अशा व्यक्तींना लघवी करतेवेळी वेदना होणे तसेच मूत्रमार्गामध्ये जळजळ होणे ही समस्या जाणवू शकते.

मूत्रमार्गातील जळजळ आणि वेदना होण्याची काही लक्षणे :

– मूत्र करताना वेदना किंवा जळजळ जाणवणे.

– वारंवार लघवी करण्याची इच्छा होणे.

– लघवीचा रंग गडद होणे.

– पोटाच्या खालच्या भागात वेदना जाणवणे.

मूत्रमार्गातील जळजळ आणि वेदना होण्यावर काही उपचार :

योग्य ते औषधोपचार घ्यावेत

मूत्रमार्गामध्ये जळजळ किंवा वेतना होत असल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि डॉक्टरांमार्फत सुचवण्यात आलेले औषधोपचार करावे.

पुरेसे पाणी पिणे

शरीरासाठी जेवढे पाणी आवश्यक आहे तितके पाणी पिणे गरजेचे आहे तसे न झाल्यास डीहायड्रेशन होऊ शकते आणि त्यामुळे मित्रमार्गामध्ये जळजळ आणि वेदना जाणवू शकतात म्हणून पुरेसे पाणी प्यावे.

आरोग्यदायी आहार सुद्धा घ्यावा 

जे पदार्थ खाल्ल्यामुळे जळजळ होते असे पदार्थ खाणे टाळावे तसेच फळे, पालेभाज्या आणि संपूर्ण धान्यांचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा.

गर्भधारणेसाठी योग्य काळजी घ्यावी

गर्भधारणेदरम्यान योग्य पद्धतीने आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

डॉक्टरांचा सल्ला वेळोवेळी घ्यावा

मूत्रमार्गामध्ये जळजळ किंवा वेदना होणे ही समस्या दीर्घकाळ जाणवत असल्यास किंवा समस्या गंभीर असल्यास, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टर परिस्थितीनुसार योग्य ते औषधोपचार करतील किंवा आवश्यक असल्यास वेगवेगळ्या टेस्ट सुद्धा करून घेतील त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे.

मूत्रमार्गामध्ये जळजळ होत असल्यास तसेच वेदना होत असल्यास त्यासाठी वेगवेगळ्या उपचार पद्धती नक्कीच उपलब्ध आहेत परंतु कोणतेही उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मूत्रमार्गातील जळजळ आणि वेदना ही एक अस्वस्थ करणारी समस्या आहे, परंतु योग्य उपचार आणि काळजी घेऊन ही समस्या नियंत्रित करता येऊ शकते.

वर सांगितल्याप्रमाणे कोणतीही लक्षणे जाणवल्यास Urolife Clinic, Pune येथे भेट द्या. अधिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क करू शकता  +91 8686353030