पाणी अगदी कमी पिणे अथवा पातळ पदार्थ कमी घेण्याने मुतखडा(Kidney Stone) होण्याचे प्रमाण वाढत राहते. याशिवाय अति शारीरिक श्रम किंवा व्यायाम,दीर्घकाळ आजार(Chronic illness), जुलाब या कारणांनी पाण्याचे शरीरातील प्रमाण कमी झाल्याने मुतखडा (Kidney Stone) तयार होण्याचे प्रमाण वाढते. मूत्रमार्गात होण्याऱ्या जंतुसंसर्गामुळे नायडस तयार होतो व त्याचे क्षार जमा झाल्याने त्याचे मुतखड्यात रूपांतर होते. मुतखड्यामुळे बरेचदा वेदना होत नाहीत. विशेषतः जोपर्यंत हे स्फटिक एका जागी स्थिर असतात किंवा किडनीपासून मूत्राशयापर्यंत लघवी (Urine to the bladder)वाहून येणाऱ्या नलिका म्हणजेच युरेटरमध्ये अडथळा निर्माण करत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यामुळे त्रास जाणवत नाही. मात्र जर किडनी स्टोनमुळे मूत्रमार्गात अडथळा (Urinary tract obstruction due to kidney stone)निर्माण झाला तर लघवी संपूर्णपणे बाहेर न पडता अडवली जाते. त्यामुळे किडनीला सूज येते आणि वेदना निर्माण होतात.
मुतखडा ची लक्षणे (Symptoms of Kidney Stone in Marathi):
- ओटीपोटात आणि जननेंद्रियांजवळ (Near the genitals)निर्माण होणाऱ्या वेदना
- सतत मूत्रविसर्जन (Urinary excretion) करण्याची गरज वाटत रहाणे
- एका वेळी कमी प्रमाणात मूत्र शरीराबाहेर टाकले जाणे
- छातीच्या बरगड्यांच्या खालच्या बाजूला पाठीमागे आणि दोन्ही बाजूंना तीव्र वेदना
- लहरींच्या स्वरूपात निर्माण होणाऱ्या आणि कमीजास्त तीव्रतेच्या वेदना
- मूत्रविसर्जन करताना होणाऱ्या वेदना किंवा जळजळ
- लघवीचा रंग गुलाबीसर लाल किंवा तपकिरी असणे
- लघवीला उग्र वास येणे
- उलट्या व मळमळ
- जर जंतुसंसर्ग असेल तर थंडी व ताप
मुतखडा होण्याची कारणे (Causes of kidney stones in Marathi) –
बहुतेक वेळा लघवी गरजेपेक्षा जास्त कॉन्सन्ट्रेटेड झाल्यामुळे म्हणजेच लघवीमधील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे किडनी स्टोन्स होतात. विशिष्ट प्रकारचा आहार, गरजेपेक्षा जास्त वजन, काही शारीरिक विकार, एखाद्या विशिष्ट रोगावर घेतली जाणारी औषधे, तसेच सप्लीमेंट्स ही किडनी स्टोन्स होण्यामागची मुख्य कारणे आहेत.
उपचार (Treatment of Kidney Stone in Marathi):
मुतखडा व किडनी स्टोनचे निदान करण्यासाठी ब्लड टेस्ट, युरीन टेस्ट, सोनोग्राफी व सिटी स्कॅन, तसेच प्रत्यक्ष स्टोनची प्रयोगशाळेतील तपासणी या चाचण्या करतात. मुतखड्याचा उपचार हा त्याचा आकार आणि तो मूत्रमार्गाच्या कुठल्या भागात स्थित आहे, यावर अवलंबून असतो. सामान्यतः मूत्रपिंडात, युरेथ्रामध्ये अथवा लघवीच्या पिशवीत असलेले ७-८ मिलीमीटरपेक्षा लहान मुतखडे औषधांनी गळून जातात. मात्र, हे खडे बाहेर निघून गेलेत, याची पुष्टी करण्यासाठी सोनोग्राफी करणे गरजेचे असते. गरज असल्यास
शस्त्रक्रिया सांगितली जाते. हल्ली मुतखड्याच्या शस्त्रक्रिया एंडोस्कोपिक म्हणजे दुर्बिणीद्वारे केल्या जाते. गर्भवती स्त्रियांना मात्र बाळाला रेडिएशनमुळे इजा होऊ नये यासाठी पहिल्या तिमाहीत सिटी स्कॅनऐवजी अल्ट्रासाउंड करण्याचा सल्ला दिला जातो. दुसऱ्या व तिसऱ्या तिमाहीत कमी तीव्रतेचा सिटी स्कॅन करता येतो.
मुतखडा व किडनी स्टोनचे चा उपचारासाठी आजच संपर्क करा डॉ. इरफान शेख यांचा Urolife Clinic मध्ये
डॉ. इरफान शेख , यूरोलॉजिस्ट (Urologist) आणि यूरो सर्जन (Uro Surgeon) (एमबीबीएस, एमएस (जनरल सर्जरी), एमसीएच यूरोलॉजी), हे पुण्यातील टॉप युरोलॉजिस्टपैकी (Top Urologist in Pune) एक आहेत. डॉ. इरफान शेख हे युरोलॉजी विभागातील सुवर्णपदक विजेते आहेत. त्यांनी पुण्यातील बायरामजी जीजीभॉय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून जनरल हॉस्पिटलमधून एमबीबीएस केले आहे. तसेच पीजीआय, चंदीगड येथून जनरल सर्जरीमध्ये एमएस केले आहे. डॉ. इरफान शेख आपल्या रूग्णांवर वर्षानुवर्षे यशस्वीपणे उपचार करत आहेत. Urolife तुम्हाला सर्व प्रकारच्या युरोलॉजिकल उपचार सेवा प्रदान करते, जसे की किडनी स्टोनचे उपचार, मूत्राशयातील खडे उपचार, प्रोस्टेट कर्करोग उपचार, किडनी कर्करोग उपचार, आणि मूत्रमार्गाच्या संसर्गावरील उपचार, RIRS शस्त्रक्रिया आणि किडनी स्टोन काढण्यासाठी PCNL शस्त्रक्रिया आणि एन्ड्रोलॉजिकल ट्रीटमेंट सेवा. तसेच सेक्सोलॉजी थेरपी यावरही उपचार होतात.