मूतखडा (Kidney Stone) हा अत्यंत वेदना देणारा आजार आहे. वैद्यकीय भाषेत त्याला युरीनरी कॅल्कुलस (Urinary Calculus) असे म्हटले जाते . लघवी (Urine) साचून खडे (Stone) बनतात आणि काही दिवसांनी पोटात व कमरेखालील भागात टोचल्यासारख्या असह्य वेदना होतात. हे टाळण्यासाठी वेळेवर उपचार करणे गरजेचे आहे. कारण तसे न केल्यास खड्याचा आकार आणि संख्या वाढू शकते.

वैद्यकीय भाषेत पाहिल्यास मूतखडा (Kidney Stone) म्हणजे स्फटिकयुक्त कण असतात. जर मुत्रात कॅल्शियम ऑक्झिलेट, युरीक एसिड, ऑक्झॅलीक एसिडचे प्रमाण अधिक असेल तर ते किडनीत तयार होतात. आणि त्यामुळे मूत्रमार्गात अडथळा येतो.

मूतखडा (किडनी स्टोनची) लक्षणे  (kidney stone symptoms in marathi):

१) लघवीला जळजळ होते. मूत्रमार्गात तसेच मूत्राशयात आग होते.पोटात खूप त्रास व लघवीवाटे रक्त पडते.
२) पोटात व कमरेखालील भागात टोचल्यासारख्या तीव्र वेदना होतात. किडनीच्या भागात सूज येते. लघवी गडद रंगाची होते.

मूतखडा तपासणी (kidney stone diagnosis in marathi):-

मूत्रातील जंतुसंसर्ग बघण्यासाठी लघवीची तपासणी केली जाते. तर किडनीची कार्यक्षमता पाहण्यासाठी रक्ताची चाचणी केली जाते. तिला आर.एफ.टी तपासणी (RFT Diagnosis) म्हणतात. तसेच अल्ट्रासोनोग्राफी करणे महत्त्वाचे असते. गरजेनुसार एक्सरे, आय.व्ही.पी. सिटीस्कॅन, रिनल बायॉप्सी तपासण्या कराव्या लागतात

मूतखडा उपचार पद्धत (kidney stone treatment in marathi):

मुतखड्याचा उपचार हा त्याचा आकार आणि तो मूत्रमार्गाच्या कुठल्या भागात आहे, यावर अवलंबून असतो. खडा जर मूत्रपिंडात, युरेथ्रामध्ये अथवा लघवीच्या पिशवीत असेल आणि त्याचा आकार ६ मिलीमीटरपेक्षा लहान असेल. तर फक्त औषधांनी गळून जातात. पण ते तपासण्यासाठी सोनोग्राफी करणे गरजेचे असते.

 

Kidney Stone specialist in Pune

आधुनिक उपचार पद्धतीमुळे रुग्णांना कमीत कमी त्रास होऊन लवकरात लवकर बरे केले जाते. हल्ली मुतखड्याच्या शस्त्रक्रिया एंडोस्कोपिक (Endoscopic) म्हणजे दुर्बिणीद्वारे केल्या जाते.

१.लिथोट्रिप्सी पद्धत (Lithotripsy Treatment) :

रुग्णाच्या शरीराच्या बाहेरून यंत्राद्वारे खड्याला सूक्ष्म ध्वनिकंपनाने शॉक देऊन त्याचा चुरा केला जातो . हा खड्यांचा चुरा लघवीवाटे बाहेर पडतो. त्यासाठी रुग्णाला भरपूर पाणी प्यायला सांगतात . या पद्धतीत शस्त्रक्रियेची गरज भासत नाही. त्यामुळे शरीरावर कोणतीही जखम होत नाही.

२. आरआयआरएस शस्त्रक्रिया (RIRS Surgery) :  मुतखडा युरेथ्रामध्ये असेल, तर छोट्या दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्यात येते. त्याला यूआरएसएल असे म्हणतात. खडा फोडण्यासाठी लेजर अथवा अल्ट्रासाउंड तंत्राचा वापर केला जातो. यानेही जखम होत नाही

३.पीसीएनएल शस्त्रक्रिया (PCNL Surgery) : मुतखडा २ cm पेक्षा लहान असेल आणि मूत्रपिंडात असेल, तर छिद्र करून थेट मुत्रपिंडातून खडा काढण्यात येतो. या शस्त्रक्रियेला पीसीएनएल (PCNL)असे म्हणतात.

४ . युरेटेरोस्कोपी (Ureteroscopy) : मूत्रवाहिनीत साचलेले खडे युरेटेरोस्कोपी तंत्रज्ञानाद्वारे काढता येतात. या शस्त्रक्रियेनंतर २४ ते ४८ तास वेदना होतात.

५. ओपन सर्जरी (Open Surgery) : अत्यंत वरच्या कुठल्याही पद्धतीने मुतखडा न निघाल्यास ही शस्त्रक्रिया केली जाते. याने बराच त्रास होतो आणि शरीरावर जखम राहते.

वेळीच उपचार झाल्यास पुढचा गंभीर त्रास वाचवता येतो.

डॉ. इरफान शेख – Consultant यूरोलॉजिस्ट, यूरो सर्जन आणि एंड्रोलॉजिस्ट (एमबीबीएस, एमएस (जनरल सर्जरी), एमसीएच यूरोलॉजी), हे पुण्यातील best युरोलॉजिस्टपैकी एक आहेत (Best Urologist in Pune). A gold medalist in the department of Urology, Dr. Irfan Shaikh specializes in Female Urology in India. He has completed his education at one of the top colleges. He has completed MBBS from Byramjee Jeejeebhoy Government Medical College & Sasson General Hospital in Pune and MS in general surgery from PGI, Chandigarh. Moreover, he has also done M.Ch in Urology from Topiwala National Medical College & BYL Nair Charitable Hospital. डॉ. इरफान शेख त्यांच्या रूग्णांवर सर्व वैद्यकीय ज्ञान आणि कौशल्याने उपचार करण्याची खात्री देतात.