प्रोस्टेट कर्करोग हा पुरुषांमध्ये आढळून येणारा कर्करोग आहे. प्रोस्टेट कर्करोग प्रोस्टेट ग्रंथी मध्ये उद्भवतो. प्रोस्टेट ग्रंथी ही एक लहान आकाराची ग्रंथी आहे जी पुरुषांच्या प्रजनन प्रणालीमध्ये स्थित असून ही ग्रंथी मूत्रमार्गाच्या आसपास असते आणि तिचे मुख्य कार्य शुक्राणूंचे पोषण तसेच वाहतूक करण्यासाठी द्रव तयार करण्यात योगदान देणे आहे.
प्रोस्टेट कॅन्सरची लक्षणे
प्रोस्टेट कॅन्सराची लक्षणे प्रारंभिक अवस्थेत कमी प्रमाणात असू शकतात. काही सामान्य लक्षणे पुढील प्रमाणे आहेत:
– वारंवार लघवी होणे : वारंवार लघवी होणे, विशेषतः रात्री लघवी होण्याचे प्रमाण वाढणे हे प्रोस्टेट कॅन्सरचे सुरुवातीचे लक्षण असू शकते.
– लघवी मध्ये रक्त आढळणे : जर लघवी मध्ये रक्त आढळून आले तर हे सुद्धा प्रोस्टेट कॅन्सरचे लक्षण असू शकते.
– वीर्यामध्ये रक्त आढळणे : वीर्यामध्ये रक्त आढळून आल्यास प्रोस्टेट कॅन्सरची लक्षणे असण्याची शक्यता आहे.
– लघवी करण्यामध्ये अडचण जाणवणे : जर लघवी सुरू होते वेळी आणि थांबवते वेळी अडचण येत असेल म्हणजेच लघवीचा प्रवाह व्यवस्थित होत नसेल तर हे सुद्धा प्रोस्टेट कर्करोगाशी लक्षण असण्याची शक्यता असते.
– वेदनादायक लघवी : लघवी करतेवेळी वेदना जाणवणे तसेच अस्वस्थता अनुभवणे हे प्रोस्टेट समस्याचे लक्षण असण्याची शक्यता असते.
– काही भागांमध्ये सतत वेदना जाणवणे : पाठीच्या खालील भागामध्ये सतत वेदना जाणवणे हे प्रोस्टेट कर्करोगाचे लक्षण असू शकते.
– एअरटेल डिसफंक्शन असणे.
– काही प्रयत्न न करता वजन आपोआप कमी होणे.
– हाडे दुखणे.
प्रोस्टेट कॅन्सरची लक्षणे आणि यशस्वी उपचाराचे पर्याय :
प्रोस्टेट कॅन्सराचे निदान सामान्यतः पुढील पद्धतींनी केले जाते:
- प्रोस्टेट विशिष्ट प्रतिजन PSA ( Prostate-Specific Antigen ) चाचणी: रक्तातील PSA (Prostate-Specific Antigen) स्तराची मोजणी या चाचणीमध्ये केली जाते,प्रोस्टेट विशिष्ट प्रतिजन PSA हे प्रोस्टेट ग्रंथी मध्ये तयार होत असलेले प्रोटीन आहे.
- डिजिटल रेक्टल एक्झाम ( digital rectal exam ): डॉक्टर प्रोस्टेट ग्रंथी, मुळव्याध यामध्ये काही समस्या आहे की नाही याची तपासणी डॉक्टरांमार्फत केली जाते.
- बायोप्सी : डॉक्टर अधिक विश्लेषणासाठी प्रोस्टेट ग्रंथीतून ऊतीचे नमुने घेऊन तपासणी करतात यामध्ये बायोप्सीसह अल्ट्रासाऊंड तसेच एमआरआय यासारख्या इमेजिंग तत्रांचा सुद्धा उपयोग करू शकतात.
प्रोस्टेट कॅन्सरसाठी उपचाराचे पर्याय :
प्रोस्टेट कॅन्सरच्या उपचाराची निवड कॅन्सरच्या अवस्थेवर आणि रुग्णाच्या संपूर्ण आरोग्यावर अवलंबून असते, डॉक्टरांमार्फत योग्य तो निर्णय घेतला जातो. काही उपचार पर्याय पुढील प्रमाणे आहे :
- संप्रेरक थेरपी : टेस्टोस्टेरॉनचे उत्पादन रोखणे यामुळे कर्करोगाची वाढ कमी करण्यामध्ये मदत होते.
- सर्जरी : प्रोस्टेट ग्रंथी किंवा जवळच्या ऊतींची शस्त्रक्रिया केली जाऊ शकते.
- किरण उपचार / रेडिएशन थेरपी : उच्च-ऊर्जेच्या किरणांचा वापर करून कॅन्सरच्या पेशी नष्ट केल्या जातात.
- लक्षित औषधे थेरपी : कर्करोगाच्या पेशी विकृतीच्या उद्देशाने औषध थेरपी देणे.
- इम्युनोथेरपी : प्रोस्टेट कर्करोगाच्या पेशींना लक्ष करून नष्ट करण्यासाठी वाढवली जाते,शरीराच्या प्रतिकारक यंत्रणेचा वापर करून कॅन्सरचा सामना करणे.
- केमोथेरपी : कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यासाठी औषधांचा वापर केला जातो.
- प्रोटॉन बीम रेडिएशन : या प्रकारच्या रेडिएशन थेरपी मध्ये कर्करोगाच्या पेशींवर त्यांना मारण्यासाठी अगदी लहान कणांचा उपयोग करून हल्ला केला जातो.
- हार्मोन थेरपी : पुरुषांमधील टेस्टोस्टेरोन हार्मोन ज्यावेळी प्रोस्टेट कर्करोग असतो त्यावेळी प्रोस्टेट कर्करोगाच्या पेशी त्यामुळे वाढू शकतात म्हणून या उपचार पद्धतीमध्ये कर्करोगाच्या पेशी त्यांना मिळण्यापासून रोखण्यास मदत करतात.
- बिस्फोस्फोनेट थेरपी : जर आजार हाडांपर्यंत पोहोचला तर या औषधांमुळे वेदना कमी होऊ शकतात आणि फ्रॅक्चर टाळता येऊ शकते.
- क्रायोथेरपी किंवा क्रायो सर्जरी : या प्रक्रियेमध्ये लहान प्रोब किंवा सुया प्रोस्टेटमध्ये टाकून कर्करोगाच्या पेशी गोठवून त्यांना नष्ट करण्यासाठी अतिशय थंड वायू वितरित केला जातो. परंतु ही प्रक्रिया डॉक्टरांनी शिफारस केलेल्या उपचारापैकी पहिला उपचार नसतो.
- प्रोस्टेट कर्करोगाची लस : प्रोस्टेट कर्करोगाच्या लसीमुळे संसर्गाशी लढण्यासाठी चालना मिळते तसेच प्रोस्टेट कर्करोगाची लस घेतल्यामुळे कर्करोगाच्या पेशींवर हल्ला करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यामध्ये मदत होते.
12 . सतत निरीक्षण करणे : डॉक्टर प्रोस्टेट कर्करोग आढळून आल्यास त्यावर उपचार करण्यापूर्वी ट्यूमर वाढत आहे की पसरत आहे की नाही हे बघण्यासाठी वाट पाहण्यास सुचवू शकतात आणि काही लक्षणे बदलल्यास किंवा डॉक्टरांनी व्यवस्थितरित्या निरीक्षण केल्यानंतर त्यांना एकंदरीत परिस्थिती निदर्शनास आल्यानंतर प्रोस्टेट कॅन्सरवर योग्य ती उपचार पद्धती अवलंबली जाते.
प्रोस्टेट कॅन्सर एक गंभीर समस्या असली तरी योग्य निदान आणि उपचारांमुळे यावर नियंत्रण ठेवता येऊ शकते. प्रोस्टेट कर्करोगाची काही लक्षणे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. यशस्वी उपचारासाठी योग्य योजना आखणे आणि वेळेत उपचार घेणे आवश्यक आहेत. आपल्याला या विषयावर अधिक माहिती हवी असल्यास, नक्कीच डॉक्टरांशी संपर्क साधू शकता. प्रोस्टेट कॅन्सर बद्दल अधिक माहिती किंवा उपचार हवा असेल तर Urolife Clinic येथे भेट देऊ शकता. संपर्क – (+91) 8686353030 At Urolife Clinic Dr. Irfan Shaikh is the best Prostate Cancer Specialist in Pune.